।। ॐ साईं राम ।।
- श्री साईं बाबांचे शिर्डी येथे पुनरागमन
बाबा काही काळ शिर्डी येथून गुप्त होते आणि बाबांनी पुन्हा शिर्डित आगमन केले ते शिर्डित आलेल्या मुसल्मानाच्या व्हाराद्यात. श्री साईंच्या आधी संत गोपीदास आणि संत देविदास यांचा सहवास शिर्डी येथे लाभला होता. औरंगाबाद जिल्ह्यात धुप या खेडेगावामध्ये एक चांद पाटील नावाचे भाग्यशील गृहस्थ राहत होते. चांद पाटील गेल्या दोन महिन्या पासून आपल्या एका हरवलेल्या घोडीचा शोध घेत होते. पाटील पूर्ण निराश होउन घोडी मिळण्याची आशा सोडून, खोगीर पाठीवर मारून माघारी फिरले. औरंगाबाद सोडून चार कोस अंतर जाता एका आंब्याच्या वृक्षा खाली बाबा आसनस्थ होते. त्यांच्या डोक्यावर टोपी, अंगात कफनी, खाकेस खटका होता. बाबांनी पाटील यांना सावलीत बसवले आणि चिलीम पिऊन मग पुढे निघ असे सांगितले. पाटील यांनी आपल्या हरवलेल्या घोडीचे विषयी बाबांना सांगितले. बाबांनी उपदेश केला की जा त्या नlळीत शोध आणि त्यानुसार पाटील यांना घोडी तेथेच सापडली. पाटील यांना बाबांच्या महानतेचा अंदाज आला होता. ते बाबा न जवळ बसले होते. बाबांनी चिमटा मातीत खुपसला आणि निखारा काढला. पुढे बाबांनी जमिनीवर सटका आपटून त्यातून पाणी काढले. पाटील यांना बाबांची महती कळली आणि त्यांनी बाबांना घरी चलण्यास विनंती केली. चांद पाटील यांच्या बायकोच्या भाच्याचा विवाह शिर्डी येथे जुळला होता. बाबा थोडे दिवस पाटील यांच्या घरी राहिले आणि मग वऱ्हाडा समवेत शिर्डीत आले.
- श्री साई बाबांचे "साई" नामाभिमान
शिर्डीत आलेले वऱ्हाड खंडोबाच्या देवळापाशी म्हलासापातिच्या अंगणात उतरले. मोठ्या मानाने भगत "या साई" म्हणून साईंच्या सामोरे गेले. त्या पुढे बाबांचे नाव "साई" जन समुदायात रूढ झाले.
शिरडी येथे पुणतांब्याचे एक गृहस्थाश्रामी थोर वैष्णव यांचे वरचेवर येणे होत असे. त्यांची जेव्हा बाबांशी समोरासमोर भेट झाली तेव्हा त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, "धन्य ते शिर्डीचे भाग्य की, असले श्रेष्ठ रत्न मिळाले" . त्या प्रमाणेच आनंदनाथ नावाचे दुसरे संत यांनी श्री साई बाबांची महती भाकीत केली की "हे अद्भुत कर्तृत्व करतील".
अक्कल्कोट स्वामींचे एक भाई नावाचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते. त्यांना इच्छा झाली की, अक्कल्कोतला जावे आणी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यावे. त्यांनी अक्कल्कोटला जाण्याचा बेत ठरवला. उद्या जाणार, तर त्यांना आज स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि त्यांनी आज्ञा केली की सध्या माझा निवास शिरडी येते आहे, तर तु तेथे जा. आज्ञे प्रमाणे त्यांनी शिरडी येथे निम्ब वृक्षा खाली श्रावणातील शुद्ध पक्षाच्या पुण्य काळी पादुकांची स्थापना केली. भाईंनी केलेल्या पुढील योजने नुसार, दिक्षित् नावाच्या ब्राम्हणांनी पूजा करावी आणि सगुन नावाच्या भक्ताने इतर व्यवस्था पाहावी. बाबा सदा म्हणत "गरीबी म्हणजेच खरी बादशाही आहे, श्रीमति पेक्षा गरिबी लाख पटीने श्रेष्ठ आहे, गरीबांचा अल्ला भाई असतो".
निमगावाचे जहागिरदरी प्रसिद्ध त्रिंबक डेण्गाळ्याच्या घराण्याकडे होती. त्यातील बाबासाहेब डेण्गाळ्यावर बाबांचे भारी प्रेम होते. निमागावाच्या फेरिवर निघाले की बाबा त्यांच्या घरी जात आणि अति प्रेमाने दिवसभर त्यांच्याशी बोलत असत. त्यांना नाना साहेब नावाचा छोटा भाऊ होता. ते मनाने खूप खिन्न होते. कारण त्यांना दोन लग्नातूनही मूल बाळाचा योग नव्हता. बाबा साहेबांनी नाना साहेबांना साई दर्शनसि पाठवले. त्यांना बाबांचा आशीर्वाद लाभून पुत्र प्राप्त झाला. त्या नंतर साई बाबांची महिमा असा वाढत गेला, त्यांच्या दर्शना साठी अनेक लोक शिर्डीस येउ लागले. जसा बाबांचा लौकिक वाढत गेला, तसा त्यांचा भक्त परिवार ही वाढत गेला. साई बाबांचा पोशाख म्हणजे, अंगात पायगोळ कफ़नि आणि डोक्याला एक पांढरा कपडा. पोत्याच्या एका तुकड्यावर त्यांची नित्य बैठक असे. थंडी पासून रक्षण म्हणून, बाबांकडे फक्त धुनिच तेवढी होती. सकळ प्रपंच वृतीच्चे (राग, द्वेष, सुख, दुख, भय, भीति) हवन धुनि मधे ते नाना प्रकारच्या युक्त्यांनी करत. त्यांच्या तोंडी सदैव "अल्ला मलिक" असे आणि ते सदा त्यांचे गुणगान गात. आरंभी साईना दिवे लावण्याची आणि रोषणाईची खुप् हौस होती. त्यासाठी ते स्वत दुकानदाराकडे तेल मागण्या साठी जात. तेलाची भिक्षा मागत आणि ते तेल आणून पणत्यात भरत आणि मशिदीत, देवळात पणत्या पेटवित असत. परंतु एकदा वाण्याच्या मनात कपट आले आणि त्याने तेल देण्यास नकार केला. बाबा काहीही न बोलता परत आले. तेल नसता आता ते काय करतात याची मजा वाणी पाहू लागले. बाबांनी मशिदीतील चौथारयावरील टमरेल उचलून घेतले. त्यात थोडेसे तेल होते. मोठ्या कष्टाने तेल वात पेटवली जाईल त्या तेलात त्यांनी पाणी घातले आणि ते स्वतः पिउन टाकले. अशा प्रकारे ब्रह्मार्पण करून त्यांनी निव्वळ पाणी घेतले आणि मग ते पणत्यात ओतून बाबांनी दिवे पेटविले. अगदी थोडेसेही तेल नसतांना त्या पणत्या रात्रभर जळल्या. धन्य ते बाबा!
मूळ अहमदनगर येथे राहणारा एंक फकीर ज्याचे नाव जव्हार अली होते, तो शिर्डीस आला आणि बाबां जवळ मशिदीत राहिला. हा फकीर मोठा गोड बोलणारा होता. गाव त्याच्या भजनी लागला. बाबांना देखील त्याने काही कारणी करून मोहिनी घातली, असे लोक म्हणू लागले. तो फकीर बाबांना म्हणाला, "तू माझा चेला हो". बाबांनी हो म्हणाताल्यावर त्यांना खूप आनंद झाला.बाबां सारखा खंबीर शिष्य अंड जव्हार अली त्यांचे गुरु झाले. दोघांचा राहत्यास राहण्याचा विचार झाला. गुरूला शिष्याच्या कलेची कल्पना नव्हती आणि शिष्याला गुरुह्या अव्कालेची कल्पना नव्हती. परंतु बाबांनी केवाही उपमर्द केला नाही आणि आपला शिष्य धर्म पाळला. गुरु मुखातून जे जे वाचन बाहेर पडत, त्याची योग्यता किंवा अयोग्यता पहिली नाही आणि ते वरच्यावर झेलेले. बाबांनी गुरूच्या घरी पाणी देखील वाहिले. शिर्डी गावकरी विचार करत की बाबा फकिराच्या नादी लागले आणि शिर्डीला अंतरले. पण साई बाबांची कळा वेगळीच होती, ते आपल्या देहाचा अभिमान जाळीत होते. त्यांचे हे आचरण लोकसंग्रहा करिता होते. शिर्डीत बाबांच्या प्रेमळ भक्तांना बाबांपासून अलिप्त राहणे अयोग्य वाटले. पुढे शिर्डी येथे आलेल्या देविदासांनी जव्हार अली यांचा भ्रम दूर केला. हे गुरु शिष्याचे आचरण श्री म्हाळसापती यांनी कथित केले.
|| श्री सदगुरू साई नाथार्पान्मस्तुं ||
Jai Shri Sai !